Skip to product information
1 of 1

Gene Machine By Venki Ramkrushnan, Madhuri Shanbhag(Translators) जीन मशीन

Gene Machine By Venki Ramkrushnan, Madhuri Shanbhag(Translators) जीन मशीन

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मनोरंजक आणि त्याच बरोबर विचार प्रवर्तक असणारे ‘जीन मशीन’ हे पुस्तक विज्ञानाच्या विश्वावर अनेक दिशांनी प्रकाश टाकते. स्वतः लेखक, प्रथिन कसे निर्माण होते याचा शोध लावून त्या विषयातील एक महत्त्वाचे संशोधक ठरले. विसाव्या शतकामध्ये जीवशास्त्रामधील एका सखोल रहस्यावर संशोधनाचा प्रकाशझोत पडून ते कसे उजळले, हे त्यांच्या शब्दांतून आपल्या समोर येते. यामध्ये विज्ञानातील ओघवत्या कथेचा प्रवाह तर आहेच पण त्यातील मानवी पैलूही तितकेच मनोवेधक आहेत. ‘डबल हेलिक्स’ या गाजलेल्या कहाणीच्या परंपरेला ‘जीन मशीन’ पुढे नेते. विज्ञान कसे विकसित होते, त्यात कशा अडचणी येतात, नवे आयाम कसे जोडले जातात, स्पर्धा कशी निर्माण होते अन् छुपे शत्रुत्व कसे प्रवेश करते, शेवटी सशक्त सत्य कसे प्रगटते यांचा वेध घेतलेला आहे. आधी रायबोसोम जीवशास्त्राच्या संशोधन
विश्वाबाहेर असलेले एक भारतीय स्थलांतरित आणि मूळचे पदार्थविज्ञान विषयाचे अभ्यासक असलेले वेंकी रामकृष्णन यांनी आपल्या भूमिकेच्या बाहेर येऊन पुस्तकभर आपली तटस्थ नजर राखलेली आहे. विज्ञानाच्या जागतिक क्षेत्रातही अत्युच पुरस्कार देताना कसे राजकारण केले जाते, त्यामागे किती अन् कशी स्पर्धा असते, (या दोन्ही गोष्टी आजच्या प्रगत विज्ञानाच्या संस्कृतीवर अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम करतील असा माझा होरा आहे) हे दर्शवताना रामकृष्णन यांचा प्रामाणिक प्रयत्न इतका गुंतवून ठेवतो की, मला हे पुस्तक संपूर्ण वाचेपर्यंत खाली ठेवता आले नाही.

View full details