Gautam Adani By R N Bhaskar, Punam Chhatre(Translators) (गौतम अदानी)
Gautam Adani By R N Bhaskar, Punam Chhatre(Translators) (गौतम अदानी)
Couldn't load pickup availability
गौतम अदानी या नावाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. बंदरं, शाश्वत ऊर्जा. विमानतळ, शहर गॅस वितरण, ऊर्जेचे ट्रान्समिशन, औष्णिक ऊर्जा, खाद्य तेल, सिमेंट, रेल्वे असा प्रचंड विस्तार असलेल्या एका महाकाय उद्योगसमूहाच्या ते प्रमुखपदी आहेत. अदानी समूह आता लवकरच टेलिकम्युनिकेशन्स, डेटा केंद्र, तांबं, अॅल्युमिनियम आणि स्टील यांच्या निर्मितीमध्ये उतरणार आहे. सध्या आशियामध्ये ते सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारे आहेत आणि जगातल्या पहिल्या पाच मूल्य-निर्मात्यांमध्ये अदानींचा समावेश होतो. अनेकदा चर्चेत असूनही, या अतिशय बुद्धिमान व्यावसायिकाबद्दल, त्यांच्या प्रेरणेबद्दल, दृष्टिकोनाबद्दल, आयुष्याबद्दल आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल फार कमी लोकांना, फार कमी गोष्टी माहीत आहेत.
या पुस्तकातून अदानींच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या बालपणीबद्दलच्या रंजक गोष्टी, व्यवसायामध्ये त्यांचा झालेला शिरकाव, त्यांचं कुटुंब, लग्न अशा विविध गोष्टींबद्दल या पुस्तकात सांगितलेलं आहे. तसंच, विविध व्यावसायिक धोरणांचं विश्लेषण ते कसं करतात, संधी कशी हेरतात आणि चुकांतून कसं शिकतात, याचीही उदाहरणं या पुस्तकात आहेत. या त्यांच्या गुणांमुळे अदानी यांनी त्यांच्या कंपनीला यशाच्या मार्गावर तर नेलंच; पण त्यांनी सर्वांसाठीच एक उदाहरण घालून दिलं आहे.
Share
