Gammat Shabdanchi! By Varsha Chougule (गंमत शब्दांची!)
Gammat Shabdanchi! By Varsha Chougule (गंमत शब्दांची!)
Couldn't load pickup availability
वर्षा चौगुले यांचं ‘गंमत शब्दांची' या सदरामधलं लेखन शाळकरी
वयातल्या मुलांना समोर ठेवून केलेलं... लहान मुलांची जिज्ञासा,
त्यांचं अनुभवविश्व, त्यांच्या कुटुंबातलं घरगुती वातावरण, त्या
आनंदाची ठिकाणं आणि त्यांच्या ठायी असणारं अपार कुतूहल
या साऱ्यांचं भान असणाऱ्या या लेखिकेनं शब्दांची ही गंमत सांगितली
ती आजी आणि नातीच्या संवादरूपात...
आजच्या सामाजिक वातावरणात बहुतेक घरातून आजी कधीच हद्दपार
झालेली... चौगुले यांनी मुलांच्या आयुष्यात ही आजीही आणली आणि
शब्दही... या त्यांच्या लेखनामुळे मुलांची शब्दांविषयीची, त्यांच्या
वापराविषयीची जाण वाढेल; पण त्याचबरोबर आजीविषयीची ओढही
वाढीस लागेल. अशी प्रेमळ आणि चौकस आजी प्रत्येक मुलाला हवीहवीशी
वाटेल, हे नक्की!
म्हणूनच हे पुस्तक जसं भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं, तितकंच कुटुंबातले
नातेसंबंध सुदृढ करणारंही! म्हणूनच शब्दांच्या अर्थांचं आणि वापराचं भान
देणारं हे पुस्तक जितकं मुलांसाठी उपयोगाचं, तितकंच शिक्षित प्रौढांसाठीही
महत्त्वाचं... ते भाषेच्या आणि शब्दांच्या वापराबद्दल सजग करतं आणि मनोरंजनही
करतं. वाचकाला समृद्ध करतं आणि शब्दांबद्दलची वाचकांची जिज्ञासाही वाढीस लावतं.
सदानंद कदम, सांगली
Share
