Foreign Biographies Of Raja Shivchatrapati By Surendranath Sen, Rohit pawar(Translators) ( फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती )
Foreign Biographies Of Raja Shivchatrapati By Surendranath Sen, Rohit pawar(Translators) ( फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती )
Couldn't load pickup availability
फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती
सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथल्या संस्कृतीबद्दल, लोकांच्या राहणीमानाबद्दल त्यांनी नोंदी करून ठेवल्या. कोणी प्रवासवर्णने लिहिली, कोणी अहवाल लिहिला, तर कोणी चरित्रग्रंथ. यादरम्यान काही परकीयांनी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या. संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी द ग्वार्द, शिवाजी महाराजांचे स्वप्न अगदी कौतुकाने ऐकणारा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे, शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीचे वर्णन करणारा डच अधिकारी फ्रांस्वा व्हॅलेंटाईन, रायगड किल्ल्याचे ‘अभेद्य’ असे गुणवैशिष्ट्य सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स आणि शिवराज्याभिषेकास स्वतः उपस्थित राहून राजधानी रायगडावरील या सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडेन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण-दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी फ्रांस्वा मार्टिन… अशा अनेक परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते. या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदींचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तावेज आहे.