Fighting Cancer with the Thali (Marathi) By Rita Date & Dr. Seema Sonis, Prajakta Chitre(Translator )(फायटिंग कॅन्सर विथ द थाली )
Fighting Cancer with the Thali (Marathi) By Rita Date & Dr. Seema Sonis, Prajakta Chitre(Translator )(फायटिंग कॅन्सर विथ द थाली )
Couldn't load pickup availability
‘आहारातून कॅन्सरशी लढा’ हे कॅन्सरच्या संदर्भातलं सर्वसमावेशक पुस्तक आहे. कॅन्सरला रोखण्यासाठी काय करावं, कॅन्सर झाल्यास उपचारांदरम्यान होणाऱ्या साइड इफेक्ट्सचा त्रास कसा कमी करावा, हे या पुस्तकात सविस्तरपणे दिलं आहे. रिता दाते आणि सीमा सोनीस या दोन्ही लेखिकांना आहारतज्ज्ञ म्हणून काम करताना मन (माइंड), आहार (न्यूट्रिशन) आणि हालचाल (मूव्हमेंट) या तीन गोष्टींचं महत्त्व लक्षात आलं. त्यातून त्यांनी एमएनएम या संकल्पनेची मांडणी केली आहे.
कॅन्सरच्या संदर्भातल्या सर्व विषयांचा बारकाईने अभ्यास करून आधुनिक वैद्यकशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतलं शहाणपण यांची योग्य सांगड घालून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनासाठी हे एक उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे.
कॅन्सर पेशंट्सना आहाराचा सल्ला देणारी फार कमी पुस्तकं आहेत. विशेषतः भारतीय लोकांसाठी अशी पुस्तकं फारशी नाहीतच. आपल्या देशातील आहाराचं आणि रोगांचं स्वरूप कसं बदलत आहे याचा अचूक परामर्श लेखिकांनी अतिशय छान पद्धतीने घेतला आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेने आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण कमी होतं; पण आज मात्र आपण आपल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या व्याधींच्या बाबतीत पाश्चिमात्यांच्या फार मागे राहिलेलो नाही. भारतीय पाककला संस्कृतीचं सार म्हणजे थाळी. थाळीला आरोग्यपूर्ण जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून, तिचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. पारंपरिक थाळीच्या माध्यमातून त्यांनी आरोग्याला पोषक अशा आहाराची मांडणी केली आहे. आजाराचं मूळ कोणकोणत्या गोष्टींमध्ये असतं, ते साध्या-सोप्या भाषेत या पुस्तकात वाचायला मिळतं. दुखणी टाळण्यासाठी आपल्या जगण्यात निरोगी जीवनशैलीचा अंतर्भाव कसा करायचा, याबद्दल विस्तृत माहिती पुस्तकात वाचायला मिळते.
Share
