Ethiopiyi Suras Katha By Umesh Kadam (इथियोपियी सुरस कथा)
Ethiopiyi Suras Katha By Umesh Kadam (इथियोपियी सुरस कथा)
Couldn't load pickup availability
‘आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस’ या जागतिक मानवतावादी संघटनेतल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले उमेश कदम यांचा ‘इथिओपियी सुरस कथा’ हा कथासंग्रह. कामाच्या निमित्ताने दहा वर्षं ते आफ्रिकेत होते. त्यांपैकी अडीच वर्षं ते इथिओपियात वास्तव्यास होते. या कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. ‘भुतांची टेकडी’, ‘मेंगेशा’, ‘इथिओपियी कांद्यांची गोष्ट’, ‘चिन्मय आफ्रिका’ यांसारख्या एकूण पंधरा कथा त्यात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कथांमधून इथिओपियन संस्कृती, दैनंदिन जीवन आणि त्या अनुषंगाने सर्व गोष्टींचं चित्रण आढळतं. त्या संदर्भातले विविध उल्लेख अगदी बारकाव्यांसहित येतात. इथिओपियातलं दैनंदिन जीवनच या कथांमधून वाचकांना भेटत राहतं. लेखकाच्या स्वानुभवांवर आधारित असलेल्या या सर्वच कथांमधून त्याच्या परिघातल्या सर्व माणसांचं भावविश्वही उलगडतं. उमेश कदम यांनी सत्य घटनांना कल्पिताची जोड देऊन लिहिलेल्या या कथा अतिशय ओघवत्या शैलीत आल्या असून त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
Share
