Skip to product information
1 of 1

Eka Nausainikachya Diary tun By Krushna Shetkar(एका नौसैनिकाच्या डायरीतुण- कृष्णा शेटकर)

Eka Nausainikachya Diary tun By Krushna Shetkar(एका नौसैनिकाच्या डायरीतुण- कृष्णा शेटकर)

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 100.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

'डायरी एका नौसैनिकाची' या माझ्या पहिल्या पुस्तकात माझे गोव्यातील बालपण, पुण्यातील शिक्षण व त्यानंतर भारतीय नौसेनेत दाखल झाल्यावर आरमारी जीवनातील काही प्रसंग व अनुभव लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 'मुक्तांगण प्रकाशन, पुणे' चे प्रकाशक श्री. राजू भानाकर यांनी चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांच्या मदतीने मुखपृष्ठावर लढाऊ जहाज उफाळलेल्या समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असताना दाखविल्यामुळे मुखपृष्ठ आकर्षक झाले ! डायरी लिहिण्याची सवय लहानपणापासूनच असल्यामुळे आरमारी जीवनातील विविध प्रसंग मी त्या पुस्तकात डायरीच्या आधारे लिहिले आहेत. डायरीतील आणखी खूप काही जे राहिले, ते 'डायरी एका नौसैनिकाची' पुस्तकात समाविष्टे करू शकलो नाही, ते आता या ७६ व्या वर्षी वयाच्या शेवटच्या पर्वात 'एका नौसैनिकाच्या डायरीतून' या शीर्षकाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. डायरीची पाने जेव्हा चाळतो, तेव्हा माझ्या जीवनात आलेल्या व्यक्ती, ज्यांच्याबद्दल खूप काही लिहिण्यासारखे होते, त्या प्रत्यक्षात माझ्या अवतीभोवती आहेत, असा भास नेहमी होतो. कॅप्टन सतीश, मेजर डॉ. मंदाकिनी, हुतात्मा देशप्रेमी मोहनदास, कॅप्टन स्मिथ, उम्राणीकरबाई, वृद्धाश्रमातील देशपांडे, पद्मा व गोपालन, असाह्य सरिता, साधना, दर्यावर्दी एलिझाबेथ, फुलवालीच्या रुपातील श्रीमती बारेंटो वगैरे या व्यक्ती डायरीत बंदिस्त करून ठेवल्या होत्या, त्या व्यक्तींना 'एका नौसैनिकाच्या डायरीतून' या माझ्या पुस्तकात स्थान देऊन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांच्यात रमून जाण्याकरिता माझ्या अवतीभोवती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पाने 128

View full details