Duskal By Dadasaheb More (दुस्काळ)
Duskal By Dadasaheb More (दुस्काळ)
Couldn't load pickup availability
पाणी टंचाई, उजाड रान यामुळं भुकेनं आसुसलेल्या प्राण्याच्या दोन जाती – माणूस व जनावर अन् सूर्यदेवाची कृपा म्हणून पाहुणा बनून आलेला रखरखता काळ माणसाला जगवतो का मारतो याची विदिर्ण कहाणी ‘दुस्काळ..!’ शहरी जीवनात रममाण झालेले आपण सर्वच ग्रामीण वस्ती व तिथली जनता आपल्याच जगाचा एक भाग आहेत हे विसरून जात आहोत का? कारण, एक गाव – बहर व दुष्काळ दोन्ही बघितलेलं – सुबत्ता प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने अनुभवलेली; पण अचानक होत्याचं नव्हतं होतं आणि कोरडा दुष्काळ गावावर काळ बनून येतो. हा काळ गावच्या मोठ्या लोकांपासून – धष्टपुष्ट जनावरांपासून – हातावर पोट असणार्या माणसांपर्यंत सर्वांना कवेत घेतो अन् असा काही घाला घालतो की, त्याच्या तडाख्यामुळे चार जणांचं हसरं कुटुंबं घरच्या पहिल्या लेकराला अनाथ करून कायमचं निघून जातं. कोपलेला देव अन् संकट बनून आलेला दुस्काळ एका कुटुंबाला अन् गावकर्यांनाही काय काय दिस दाखवतो त्याची मन हेलावून टाकणारी कादंबरी...
Share
