Draksha Shetiche Nave Tantra By Vasudeo Chimanrao Kathe (द्राक्षशेतीचे नवे तंत्र)
Draksha Shetiche Nave Tantra By Vasudeo Chimanrao Kathe (द्राक्षशेतीचे नवे तंत्र)
Couldn't load pickup availability
'द्राक्षशेतीचे नवे तंत्र' या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या समस्यांनी अडचणीत असलेल्या द्राक्षशेतीस फायदेशीर बनविण्याचे तंत्र 'दाभोळकर प्रयोग परिवारातील प्रयोगशील शेतकरी वासुदेव चिमणराव काठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही.
सहज-सोप्या तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्षशेतीच्या सुरूवातीपासून ते बाजारात द्राक्षमाल पोहोचेपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे प्रयोगाअंती सफल झालेले ज्ञान या पुस्तकातून मिळते. अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण नोंदींचा समावेश हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
दर्जेदार द्राक्षनिर्मिती करण्याकरिता संजीवक वापराचे नियोजन, दर्जेदार द्राक्षासाठी घडसंख्येचे नियोजन, पाणी व्यवस्थापन, खतावरील खर्चाचे नियोजन आणि त्यासंबंधीचे प्रयोग व माहिती या पुस्तकात दिली आहे. तसेच डावनी, भुरी या रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यावर बाग कशी वाचवावी, यासंबंधीचे प्रयोग अशी सविस्तर माहिती या पुस्तकातून शेतकऱ्यांना मिळते. थोडक्यात, द्राक्षशेतीतील वेगवेगळ्या प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणासाठी, त्यावरील उपाययोजनांसाठी म्हणून हे पुस्तक शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करेल.