Dharmantar Ka??? By Dr. Babasaheb Ambedkar ( धर्मांतर का??? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
Dharmantar Ka??? By Dr. Babasaheb Ambedkar ( धर्मांतर का??? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
Couldn't load pickup availability
मनोगत
१३ आक्टोबर १९३५ साली नासिक जिल्ह्यातील येवला येथिल दलितांच्या परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर अमानवीय जातीयता व अस्पृश्यतेचे निर्लज्जपणे पालन करणाऱ्या उच्चवर्णिय हिंदुना जबरदस्त मानसिक धका बसला. त्यांच्या गुलामीत राबणारा अस्पृश्य समाज धार्मिकतेच्या श्रृखंला तोडून मुक्त होऊ पहात होता. तथाकथित उच्च वर्णियांच्या जातियश्रेष्ठत्वाला या माध्यमातून आव्हान मिळाले होते. म्हणून तत्कालीन तथाकथित नेत्यांनी धर्मांतराबाबत अस्पृश्यामध्ये संभ्रम निर्माण करून सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व आघाड्यावर विरोध दर्शविणारी मोहिम उघडली होती. अशा परिस्थितीत धर्मातराचा अर्थ व त्याचे महत्त्व आपल्या निःस्सीम अनुयायांना पटवून देण्याची आवश्यकता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. म्हणूनच त्यांनी मुंबई इलाखा महार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेतील 'धर्मांतर कां?' हे डॉ. बाबासाहेबांचे भाषण संस्मरणिय, ऐतिहासिक आणि आंबेडकरी चळवळीवर दुरगामी परिणाम करणारे ठरले आहे. बाबासाहेबांनी हे भाषण ३० व ३१ मे १९३६ रोजी संपन्न झालेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत केले होते. व नंतर प्रथमच ते त्यांच्या 'जनता' पत्राच्या २७ जून १९३६ च्या अंकात 'मुक्ती कोन पथे? म्हणून प्रसिद्ध झाले होते.
विषमतेचे मूर्तिमंत रूप असलेल्या हिंदू धर्माचा त्याग करायचा की नाही, या फक्त एकाच मुद्यासाठी आपल्या कट्टर अनुयायांचे मत त्यांना या परिषदेत जाणून घ्यावयाचे होते. ती खुल्या वातावरणातील सार्वमताची चाचणी होती. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतराच्या नफ्या-तोट्याचे सर्वांगीण मूल्यमापन आपल्या या भाषणात केले. व धर्मातराच्या ऐहिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही बाजूवर त्यात सखोल विचार व्यक्त करण्यात आला होता. अस्पृश्यतेची निर्मिती ही कालान्वये अस्तित्वात आलेली रूढी परंपरा नसून ती उच्चवणीय ब्राम्हणांनी स्वतःच्या हितासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली. व धर्मग्रंथांच्या आधारे तिचे समर्थन करून तिला कायमस्वरूप प्राप्त करून दिले. चवदार तळ्याचे गाणेरडे पाणी पिऊन आपण अमर होणार नाही. आणि काळारामाची पूजा केल्याने पोटाची खळगी भरणार नाही. आणि दुःखाचा अंतही होणार नाही, याची जाणिव बाबासाहेबानी दलितांमध्ये सामाजिक समतेचे लढे लढतांनाच निर्माण केली. आणि जाती वर्ण अहंकार ग्रस्त हिंदूचे गुलाम म्हणून जगण्याबद्दलचा तीव्र नकारही त्याद्वारेच निर्माण केला. त्या नकाराची सामुहिक अभिव्यक्ति म्हणजेच मुंबई इलाखा महार परिषद होती. पाने 45
Share
