Skip to product information
1 of 1

Dalit Premkavita By Dr. Rashtrapal Meshram (दलित प्रेमकविता)

Dalit Premkavita By Dr. Rashtrapal Meshram (दलित प्रेमकविता)

Regular price Rs. 765.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 765.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language
प्रेम ही निसर्गान मानवाला बहाल केलेली अद्भुत देणगी आहे. प्रेमाच्या या अनुभवातून दलित कवीही सुटले नाहीत. समाजक्रांतीची उपासना करणाऱ्या या कवी-कवयित्रींनी आपल्या प्रेमानुभवाचाही प्रभावी आविष्कार केला आहे. या प्रेमकवितांची संख्या लक्षवेधक आहे. परंतु मराठी साहित्यसमीक्षेने या प्रेमकवितेकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून दलित प्रेमकवितेवरील स्वतंत्र व समग्रलक्षी अभ्यास प्रथमच सिद्ध झाला आहे. सदर ग्रंथात 'प्रेम' ही संकल्पना अत्यंत विस्तारपूर्वक मांडण्यात आली आहे. प्रेमावर इतकी मूलगामी, विविधांगी व सिद्धान्तिक चिकित्सा प्रथमच येथे झाली आहे. दलित प्रेमकवितेतील आशय आणि अभिव्यक्तीचा समग्रलक्षी अभ्यास एकूणच मराठी काव्यमीमांसेला नवी अन्वर्थकता व नवे आयाम प्राप्त करून देणारा आहे. या प्रेमकवितेतून व्यक्त होणारा आशय वास्तवदर्शी असून दलित कवींच्या सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरील जीवनाचे प्रत्यंतर घडवून देणारा आहे. संघर्ष आणि प्रेम अशा दुहेरी मिलाफातून ही प्रेमकविता साकार झाली आहे. ही प्रेमकविता मानवी मूल्यांवर अधिष्ठित नव्या सृष्टीचे स्वप्न पाहते. प्रेमातूनच नवे जग उदयाला येईल, हा विश्वास ती व्यक्त करते. या प्रेमकवितेतील विचारसौंदयनि मराठी प्रेमकवितेचे दालन अधिक समृद्ध केले आहे. दलित कवितेवर आजवर अनेक अंगांनी चिकित्सा झाली असली, तरी दलित प्रेमकवितेवर ती पहिल्यांदाच या ग्रंथाच्या रूपाने झाली आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या निर्मितीमुळे दलित कवितेविषयी नवी अभिरुची निर्माण होऊन मराठी साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडेल व सदर ग्रंथ एक मूलगामी संदर्भग्रंथ म्हणून नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
View full details