Dagina By Nivrutti Jori (दागिना)
Dagina By Nivrutti Jori (दागिना)
Couldn't load pickup availability
ग्रामीण महाराष्ट्रातील जनजीवनाचा धांडोळा कथांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न निवृत्ती जोरी यांनी ‘दागिना’ कथासंग्रहाच्या निमित्ताने केला आहे. लेखकाची ही दुसरी साहित्यकृती.
यासंग्रहातील प्रत्येक कथा ही लेखकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या घेतलेल्या अनुभवांवर आधारित आहे.
समाजातील उपेक्षित घटकांचा संघर्ष एका संवेदनशील लेखकाच्या मनाला साद घालतो, तेव्हा त्याच्या लेखणीतून ‘दागिना’सारखी साहित्यकृती जन्माला येते, असे हे पुस्तक वाचताना ठायीठायी जाणवते.
नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांत वास्तव्य घडले, तेव्हा लेखकाने सरकारी फायलींच्या ढिगाऱ्यापलीकडे पाहात समाजस्थितीचे जे निरीक्षण केले, त्यातून ह्यासर्व कथा आकारास आल्या आहेत.
कष्टकऱ्यांना रोजच्या जीवनात कोणकोणत्या अडचणींचा मुकाबला करावा लागतो, याचे चित्र वाचकांसमोर रेखाटताना लेखक कधी सर्वसामान्यांचा वन्यजीवनाशी झालेला संघर्षकथन करतो, तर कधी हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काहींना करावीलागणारी तारेवरची कसरतउभी करतो.
जेवढ्या उत्साहाने मानवी भावभावनांचे तरल चित्रण लेखकाने केले आहे, तेवढ्याच जोशात ग्रामीण साहित्याचा वाचकवर्ग त्यास प्रतिसाद देईल, ही अपेक्षा.
Share
