1
/
of
1
Chinakul By Madhukar Dharmapurikar (चिनकुल)
Chinakul By Madhukar Dharmapurikar (चिनकुल)
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हिंदी भाषेत लघुतम कथा (लघुकथा) सातत्याने लिहिली जाते. सआदत हसन मंटोपासून उदय प्रकाशपर्यंत आजचे अनेक मोठे लेखक लघुतम कथा लिहितात. हिंदीत लघुतम कथांचे अनेक संग्रह प्रसिद्ध आहेत.
विसंवादाची अनुभूती हा साहित्याचा आधार असतो. ही अनुभूती जेवढी स्थूल, तेवढी विनोदाकडे जाते; जेवढी सूक्ष्म, तेवढी ती गंभीर होते. लघुतम कथा या दोनही स्थितीला स्पर्श करणारा साहित्य प्रकार आहे.
मधुकर धर्मापुरीकरांचा संग्रह वाचताना हा प्रत्यय येतो. सूक्ष्म विनोद, तरल आणि उत्कट जीवनानुभव हे धर्मापुरीकरांच्या लघुतम कथांचे महत्त्वाचे घटक. कथेची सगळी वैशिष्ट्ये लहानशा अवकाशात येथे एकवटलेली दिसतात.
'चिन्कुल' हा कन्नड शब्द. लहान, छोटे-छोटे अशा अर्थाचा. 'चिन्कुल'मधील लघुतम कथा म्हणजे जीवनातल्या विविधरंगी अनुभूतीचा एक कॅलिडोस्कोप आहे.
Share
