Bihar Kesri Veer Kunwarsingh By Nayantara Desai (बिहार केसरीवीर कुँवरसिंह)
Bihar Kesri Veer Kunwarsingh By Nayantara Desai (बिहार केसरीवीर कुँवरसिंह)
Couldn't load pickup availability
बिहार केसरी... वीर कुँवरसिंह
'१८५७' चा बंडाचा वणवा उफाळल्यावर, देशाच्या सर्वच दिशांनी, देशातल्या सर्वच संस्थानिक राजांनीही तो वणवा फैलावण्यासाठी अंतःकरणापासून आणि हिरीरीने त्या वणव्याला फुंकर घालून घालून तो चांगलाच चारही दिशांना फैलावत गेला.
आता, अशा ह्या 'केवळ अपुल्या देशासाठी' अशी उर्मी मनात दाटून आल्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या बस्तानाला उलथवण्यासाठी सर्व राज्यातून आपल्या तलवारी पाजळून, सर्व राजे आणि त्यांचे सर्व सैनिक, शिलेदार... महादेवाची सहस्रनामावली एकमुखाने घोष करीत इंग्रजी सेनेवर तुटून पडले. अशावेळी मग 'बिहार राज्य' उठावाने खडबडून उठले नसते तरच नवल होते.
इतर राज्यातल्या '१८५७च्या'... आरोळया, किंकाळ्या यांचा आता बिहारच्या कुँवरसिह नावाच्या 'केसरी'लाही सुगावा लागला आणि त्याने 'जय एकलिंगजी' अशीच अंतर्मनात डरकाळी फोडून त्या उठावाच्या वणव्यात हातभार लावण्यासाठी शेला कसून सामील झाला. तो एकटाच नव्हता. थोरला धावतोय म्हणताच त्यापाठोपाठं त्याचे धाकटे भाऊही त्याच हरिरीने घावले. दयालसिंह, राजपतीसिंह आणि अमरसिंहसुद्धा.
Share
