Bhasha Aani Shikshan By Sandeep Wakchoure (भाषा आणि शिक्षण)
Bhasha Aani Shikshan By Sandeep Wakchoure (भाषा आणि शिक्षण)
Couldn't load pickup availability
बोलणं, लिहिणं, वाचणं या साऱ्यातनं शब्दांचं मांडणं असतं. भाषेची आंतरिक ओढ असल्याशिवाय हे सूचणं शक्य नसतं. ही ओढ आणि हे शब्दांचं मांडणं संदीपनं आपल्या शिक्षणविषयक सलग चौदाव्या पुस्तकात फारच सहजतेनं साधलं आहे. एखाद्या प्राध्यापकाच्या घनगंभीर शब्दप्रणालीऐवजी सामान्य वाचकाला वाचता वाचता सहज समजेल इतक्या सोप्या पद्धतीनं संदीपनं शिक्षणविषयक विचार आपल्यापुढं मांडला आहे. त्याचं मनापासून अभिनंदन!
शिकवण्याची भाषा असूनही अलंकारीक शब्द नाहीत. डोईजड होणारे मुद्दे नाहीत. भाषाविषयक ओढ वाटेल आणि मुळातुन सारं समजून घ्यावसं वाटेल अशी सारी शब्दरचना आणि तिची सुलभ मांडणी संदीपनं केलीय. एकच विषय, एकच लेखक आणि एकच प्रकाशक या प्रकल्पा अंतर्गत ‘चपराक’नं संदीपची ही पुस्तकमालिका देखण्या स्वरुपात प्रकाशित केली. संत ज्ञानेश्वरांचा शिक्षण विचार, विनोबा भावेंचा शिक्षणविचार ते अगदी गिजूभाई बधेका ते थेट जे. कृष्णमूर्तीपर्यंत अनेकांच्या शिक्षणविषयक विचारांचा जयघोष या निमित्तानं झाला. हे सर्व लेखन निष्ठापूर्वक केल्याबद्दल व्वा संदीप व्वा!
– सुधीर गाडगीळ
सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार
Share
