Bhartiya Swatantrya Ladhyache Janak Adyakrantiveer Raje Umaji Naik By Suraj Madne (भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जनक आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक)
Bhartiya Swatantrya Ladhyache Janak Adyakrantiveer Raje Umaji Naik By Suraj Madne (भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जनक आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक)
Couldn't load pickup availability
Prebooking Started.....
Book Available After Publishing 3.2.2026..
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जनक आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक । लेखक - सुरज मदने
पाने - २७२
कलर पाने - ८
__________________________________
“शिवछत्रपतींच्या विचारांची मशाल हाती घेऊन,
डोंगरदऱ्यांतून घुमला स्वातंत्र्याचा जयघोष…
पराभव न मानणारा, अन्यायाशी झुंज देणारा,
स्वाभिमानासाठी मृत्यूलाही न घाबरणारा माझा राजा
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक!”
परकीय सत्तेविरुद्ध पेटलेला बंडखोर वणवा,
स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहिलेलं अखंड जीवन…
इतिहासाच्या पानांत कोरलेली
एक धगधगती, प्रेरणादायी शौर्य गाथा!
“इतिहास ज्या वीरांचे नाव घेण्यास विसरला, त्यांच्या रक्ताने स्वातंत्र्याचा पाया रचला गेला…”
ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी पुकारलेला लढा हा केवळ बंड नव्हता, तर स्वाभिमानाचा हुंकार होता. रामोशी समाजातील असंख्य रणशूर योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी संघर्ष केला. दुर्लक्षित पण कधीही न झुकणारे हे क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या पहिल्या ठिणग्या होते.हे पुस्तक म्हणजे तलवारींचा आवाज, बलिदानाची ज्वाला आणि स्वातंत्र्यासाठी पेटलेली मने यांची जिवंत साक्ष आहे. उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा संघर्ष प्रत्येक वाचकाच्या मनात धग निर्माण करेल आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल.आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि रामोशी समाजातील इतर स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला धगधगता लढा या पुस्तकात उलगडला आहे. दुर्लक्षित इतिहासातील हा पराक्रम, संघर्ष, बलिदान आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी.
Share
