Bharatmatechya Kartutvan Kanya By Vitthal Ray Bhat (भारतमातेच्या कर्तृत्ववान कन्या – विठ्ठलराय भट)
Bharatmatechya Kartutvan Kanya By Vitthal Ray Bhat (भारतमातेच्या कर्तृत्ववान कन्या – विठ्ठलराय भट)
Couldn't load pickup availability
भारतीय समाजात गेल्या अनेक शतकांपासून, विशेषतः 'मनुस्मृती' काळापासून स्त्रियांचे सामाजिक स्थान झपाट्याने खालावत चालले आहे. स्त्रीला अतिशुद्रांच्या पंक्तीला बसवून तिला शिक्षण व स्वातंत्र्यापासून वंचित करण्यात आले. वेदकाळात मात्र तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्त्रीयांचे मुंज (उपनयन संस्कार) होत असे. वेदांतील अनेकानेक ऋचा-गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, इला, शचि, सविता, सरस्वती - इत्यादी स्त्रियांनी रचिल्या होत्या. याचे स्पष्ट उल्लेख सापडतात. भास्कराचार्यांची मुलगी-लीलावती तर गणितज्ज्ञ, ज्योतिषी व सकल शास्त्रांत पारंगत होती. तिला आचार्य ही पदवी प्राप्त होती व ती गुरूकुल चालवत असे.
आदिमानव प्रारंभी गुहांतून रहात असे व नंतर टोळी करून राहू लागला. तेव्हा त्या आदिम समाजात मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. हळूहळू शेतीचा शोध, अग्नीचा शोध, वन्यप्राणी माणसाळण्याची युक्ती प्राप्त झाली. नैसर्गिकरित्या येणारे गरोदरपण, बाळंतपण व मग मुलांचे पालनपोषण यात बराच काळ स्त्रीचा व्यतीत होऊ लागला व मातृसत्ताक पद्धत लयाला जाऊन पित्तृसत्ताक जीवनपद्धती अमलात आली. पुरुषाने सर्व कारभार आपल्या हाती घेतला व स्त्रीला एक भोगवस्तू बनवली. तिला उंबरठ्याबाहेर पडण्यास बंदी, शिक्षणबंदी, निवडीच्या स्वातंत्र्यावर बंदी अशा अनेक बंधनातून जखडण्यात आले. त्यामुळे स्त्रीची सर्व त-हेची प्रगती पूर्णतया थांबली व तिच्या नशिबी फक्त गुलामगिरीचे आयुष्य आले. तुलसीदासाने आपल्या 'रामचरितमानस' या महाकाव्यातर स्पष्टपणे लिहिलेले होते.
पाने 64
Share
