Bharatcha Bhugol By -Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI (भारताचा भूगोल)-Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI
Bharatcha Bhugol By -Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI (भारताचा भूगोल)-Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI
Couldn't load pickup availability
अलीकडील काळात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर व तदनुषंगिक बाबींवर वाढत्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कोणत्या ना कोणत्या वर्षात ‘भारताचा भूगोल’ हा विषय अभ्यासावा लागतोच. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन या पुस्तकाची रचना साकारली आहे. हे पुस्तक अभ्यासताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची त्यांच्या महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करता करताच स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचीही तयारी आपोआपच व्हावी, असा दृष्टिकोन ठेवला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न हा तर मूलतः या पुस्तकाचा केंद्रबिंदूच असल्याने महाविद्यालयीन जीवनातून बाहेर पडून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थिमित्रांना ते निश्चितच उपयोगाचे आहे.
स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी या दोहोंनाही डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तकाची रचना साकारली असून प्रत्येक प्रकरणानंतर महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहेत. शेवटचे प्रकरण महत्त्वाच्या व निवडक वस्तुनिष्ठ प्रश्नांशीच निगडित असून या प्रकरणांतर्गत पाचशेहून अधिक निवडक व महत्त्वाचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिले आहेत. स्वाभाविकतःच पुस्तकाची उपयुक्तता त्यामुळे चाढली आहे.
विद्यार्थिमित्रांना ओळखीची झालेली के ‘सागरीय भाषाशैली जपतानाच भारताच्या भूगोलाचा अनेकांगी परामर्श घेणारा हा संदर्भविद्यार्थिमित्रांना त्यांच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून देण्यास खचितच उपयुक्त ठरेल या सार्थ विश्वासासह हा संदर्भ आज माझ्या विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपवीत आहे.
Share
