Skip to product information
1 of 6

bhaktirang+ Shri Gurudevdatta Upasana Mahatma+ Yogsiddhi + sanskarbodha+kuladevta+Apali Daivat Diwali Ank 2024 (भक्तिरंग + श्री गुरुदेवदत्त उपासना माहात्म्य+ योगसिध्दि + संस्कारबोध + कुलदेवता + आपली दैवत दिवाळी अंक २०२४)

bhaktirang+ Shri Gurudevdatta Upasana Mahatma+ Yogsiddhi + sanskarbodha+kuladevta+Apali Daivat Diwali Ank 2024 (भक्तिरंग + श्री गुरुदेवदत्त उपासना माहात्म्य+ योगसिध्दि + संस्कारबोध + कुलदेवता + आपली दैवत दिवाळी अंक २०२४)

Regular price Rs. 1,125.00
Regular price Rs. 1,250.00 Sale price Rs. 1,125.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

धार्मिक आणि आध्यात्मिक तथ्ये, कथा आणि अभंग असलेल्या दिवाळी अंकाचा संग्रह.

# भक्तिरंग + श्री गुरुदेवदत्त उपासना माहात्म्य+ योगसिध्दि + संस्कारबोध + कुलदेवता + आपली दैवत     दिवाळी अंक २०२४ # 
 
# भक्तिरंग # 
सदगुरु वामनराव पै....- आनंदीपणाचे रहस्य सांगणारे सद्‌गुरु श्री. वामनराव पै यांनी सर्वसामान्य माणसांचे आयुष्य आनंदी केले. आनंदात रहा. आनंदात व्यवहार करा हाच खरा धर्म. अशी शिकवण त्यांनी नेहमीच लोकांना दिली
कै. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी - संत परंपरेच्या जगविराट सामर्थ्याने असंख्य माणसांना चारित्र्य, नितिमत्ता, सत्य, अहिंसा, धैर्य, स्वसामर्थ्य, स्वदेश, स्वदेव, स्वातंत्र्य, स्वबळ अशा अनेक सद्‌गुणांचे निरुपणाद्वारा मानवता धर्माचा महामंत्र मनामनांमध्ये रुजवून 'नवचैतन्याची' ज्योत नानांनी निर्माण केली.
श्री. सत्यसाईबाबा....- सत्य, प्रेम, शांती, चारित्र्य, अहिंसा या पंचतत्वांवर अधिराज्य करणारे श्री सत्यसाईबाबा यांची थोरवी अगाधच. बाबा हे त्रिगुणात्मक दत्तमुर्ती, सर्वांचे पालनहारी, सर्वांच्या संकटात धावून जाणारे, सर्वांवर प्रेम करणारे, आखिल मानवजातीला चैतन्यदायी संदेश देणारे, अलौकिक व्यक्तिमत्व !

#  श्री गुरुदेवदत्त उपासना माहात्म्य  #
दत्तगुरुची उपासना करताना मंत्र, तंत्र, जप, गुरुचरित्र पारायण असे अनेक मार्ग आहेत. त्याचीच माहिती या पुस्तकात दिली आहे जी दनभक्तांना मार्गदर्शक ठरेल

 # योगसिध्दि # 
या अंकात..लक्ष्मीप्राप्तीसाठी दिवाळीत करावयाचे तोडगे-दैवी उपाय- मंत्र-तंत्र-यंत्र साधना असा आहे मराठीतील रहस्यकथांचा रोचक आणि रंजक इतिहास
रहस्यकथा आणि मी या शिवाय.. १०१ प्रभावी तोडगे आणि स्वामी विजयकुमार यांचे २०२४-२५ चे वार्षिक राशी भविष्य असे अनेक रहस्य ,उपाय कथा या अंक मध्ये मांडले आहे. 

# संस्कारबोध # 
संस्कारबोध'चा सहाव्या वर्षातील दिवाळी अंक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद व समाधान होत आहे. या आनंदात 'दुधात साखरे' सारखी भर घातलीये ती मुखपृष्टावरील चित्राचे यथायोग्य वर्णन करणाऱ्या काव्यपंक्तीने ! या काव्यपंक्तीचे रचनाकार आहेत सिद्धहस्त, प्रतिभावान लेखक व कवी श्री. महेंद्र जयंत वाघ (सामग्री लेखक, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे) ! जणू चित्र बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावनाच श्री. महेंद्रजींनी काव्यबद्ध करून मांडली आहे, 

 # कुलदेवता #
'कुलदेवता' या पुस्तकात विविध घराण्यांच्या कुलदेवींचे स्थान, मंदिर स्वरूप, मार्ग, पुराणकालीन कथा अथवा इतिहास तसेच सध्याची मंदिराची अवस्था, नित्य उत्सव पूजा याचे वर्णन केलेले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर येथील देवीस्थाने तसेच कुलदेवता कोल्हापूर, तुळजापूर, सप्तश्रृंगी वणीची
देवी, अंबेजोगाई, रेणुकामाता अशी विविध माहिती या पुस्तकात दिली आहे.

# आपली दैवत # 
लक्ष्मी आणि देवता उपासना - दैनंदिन जीवनात देव-देवता उपासनेला फार महत्व आहे. आपली ज्या देवावर, देवतेवर श्रध्दा आणि विश्वास आहे त्याची उपासना ही करावीच.
शिव उपासना -  शिव संसारापासून मुक्ती करणारा मुक्तीदाता आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत या सर्व गोष्टींना शिव कारण आहे. त्रिशुलधारी सिंह चर्म वेढून घेतलेला शिव खरं तर देव, स्कंद, सेनापती या सर्वांचाच पितामह आहे.

View full details