Skip to product information
1 of 2

Balatkar Ek Atal Vastav By Vivek Kashikar (बलात्कार एक अटळ वास्तव)

Balatkar Ek Atal Vastav By Vivek Kashikar (बलात्कार एक अटळ वास्तव)

Regular price Rs. 102.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 102.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

* 'लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षे बलात्कार' किंवा 'नोकरीचं आमिष दाखवून लॉजवर नेऊन तीन वर्षे बलात्कार' यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. असं खरोखरच एखाद्या स्त्रीवर तीन किंवा पाच वर्षे बलात्कार शक्य आहे का? जर एखाद्या स्त्रीला कुठेतरी तळघरात अथवा एखाद्या निर्जन ठिकाणी डांबून ठेवलं, तर कदाचित हे शक्य होईल. पण हे साध्य करण्यासाठी त्या गुन्हेगाराला बराच खटाटोप करावा लागेल, आणि ते व्यवहार्य (practicable) असेल असं वाटत नाही.

* एखादी स्त्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा केवळ कुटुंबाच्या भल्यासाठी अशी अनेक वर्षे कोणाच्यातरी लैंगिक शोषणाला बळी पडत असेल, तर तो बलात्कारच म्हटला पाहिजे. परंतु वर उल्लेखिलेल्या घटनांचा नीट विचार केला, तर एखादा माणूस आपल्यावर प्रेम असल्याचं सांगून लग्नाचं वचन देत आहे. किंवा कुठेतरी चांगली नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत आहे, आणि त्या बदल्यात त्याची शरीरसंबंधांची मागणी पूर्ण करण्यासाठी जर ती स्त्री स्वतःच्या मर्जीने त्याच्या बरोबर जात असेल, तर त्याला बलात्कार कसं म्हणता येईल? आणि समजा त्या पुरुषाने खरोखरच तिच्याशी ३/४ वर्षांनी लग्न केलं किंवा तिला चांगली नोकरी मिळवून दिली, तरीही ती स्त्री त्याच्यावर बलात्काराचा आरोप करेल का? तसेच एखाद्या हॉटेल किंवा लॉजवर खुलेआम नियमितपणे नेऊन बलात्कार होऊ शकतो का?

* वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे पुरुषाचे लिंग हे सुंदर स्त्रीच्या दर्शनाने किंवा स्पर्शाने उद्दीपित होणे; या उद्दीपित होण्यामागे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कारणीभूत असणे; तसेच पेशींची स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असणे; या एकत्रित परिणामांमुळे माणूस हा निसर्गतः त्या दिशेने कृती करतो. या विवेचनावरून हे स्पष्ट होतं की केवळ बलात्कारांच्या बाबतीतच नव्हे, तर एकूणच पुरुषांना स्त्रियांबद्दल अधिक लैंगिक आकर्षण वाटतं. त्यामुळेच त्यांना लैंगिक संबंधांची गरजही स्त्रियांपेक्षा अधिक भासते. त्यासाठी ते आग्रही असतात.
या विषम किंवा असमान लैंगिक आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी पुरुषांना संयम व संस्कारांच्या चौकटीत बसविणं हे किती खडतर आव्हान आहे?

अशा अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे आणि बलात्कार या विकृतीबद्दल तर्कशुद्ध मांडणी करणारे हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचायलाच हवे.

View full details