Skip to product information
1 of 1

Bahurup Gandhi By Anu Bandyopadhyay, Shobha Bhagwat(Translator) (बहुरूप गांधी)

Bahurup Gandhi By Anu Bandyopadhyay, Shobha Bhagwat(Translator) (बहुरूप गांधी)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

-गांधीजींचं खरं योगदान काय होतं हे अनेकांना आजही माहीत नाही.
• गांधीजी सर्व कष्टाची कामं मोठ्या आनंदानं करीत. • आपण कष्टकऱ्यांना खालचा दर्जा दिला आणि कारकुनीला वरचा, त्यांची सगळी संस्कृती, प्रतिष्ठा
आपण नष्ट केली म्हणून आज आपली परिस्थिती कठीण झाली आहे. -बॉरेस्टर गांधी रोज पहाटे जात्यावर गव्हाचं पीठ दळत आणि पाच मैल चालत आपल्या कचेरीत जात. -
स्वतःचे केस स्वतः कापत, कुष्ठरोग्यांच्या जखमा घृत, रात्रभर जागून प्लेगच्या सणांची सेवा करत, मुताऱ्या स्वच्छ करायचीही त्यांना लाज वाटत नसे. आळस, भय आणि तिरस्कार हे शब्द त्वांच्या शब्दकोशात नव्हते. -भारतापुढचा प्रश्न लोकांना आराम पुरवण्याचा नाही तर त्यांचा रिकामा वेळ उपयोगात आणण्याचा आहे.
-गांधीजी कस्तुरबांची पोलकी शिवत, स्वतःचे व इतरांचेही कपडे धूत, हातात झाडू, बादली घेऊन सफाई करत.
ते फार चांगले चांभार होते, आपल्यासाठी इतरांना कामाला लावणं त्यांना पसंत नव्हतं.
एखाद्या आईसारखं ते लहान बाळांचं करत असत. आश्रमात त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची आणि
प्रमुख आचाऱ्याची जबाबदारी घेतली होती. - ते म्हणत, नुसतं पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा त्याबरोबर तुमच्या मुलांना तुम्ही उत्तम स्वयंपाक आणि
सफाई करायला शिकवलं तर तुमची शाळा खरी आदर्श! -गांधीजी रोज सूतकताई करत. ते उत्तम डॉक्टर होते, परिचारक होते, शेतकरी होते. विणकर होते, लिलाव बोलण्यात कुशल होते. लेखक, संपादक, मुद्रक, प्रकाशक होते.
ते भिकाऱ्यांचे राजा आणि डाकूंचे राजकुमार होते.

View full details