Ayushyawar Bolato Kahi By Dr. Madhukar Sabne (आयुष्यावर बोलतो काही)
Ayushyawar Bolato Kahi By Dr. Madhukar Sabne (आयुष्यावर बोलतो काही)
Couldn't load pickup availability
डॉ. मधुकर साबणे लिखित ‘आयुष्यावर बोलतो काही’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.
डॉ. साबणे यांच्या जन्मकथेपासून सुरू होणारी ही कहाणी अनेक चढ-उतार आणि सुख-दुःखाच्या क्षणांनी भरलेली आहे.
एका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी तर करतातच; पण आपले वैयक्तिक आयुष्यदेखील भरभरून जगतात.
कोणत्याही प्रसंगाला अतिरंजित करून न सांगता त्यांचा हा प्रवास त्यांनी वास्तवाशी जोडून ठेवत सांगितला आहे. मात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर साकार करता येतात, याची अनुभूती हे पुस्तक वाचताना येते.
साबणे यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात.
Share
