Skip to product information
1 of 1

Avatibhavati Sadarchya Goshti By Suhas Malekar (अवतीभवती सदरच्या गोष्टी)

Avatibhavati Sadarchya Goshti By Suhas Malekar (अवतीभवती सदरच्या गोष्टी)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

कुठलीही कथा जिथे घडते त्या भोवतीचा परिसर ही लेखनासाठी सक्षम पार्श्वभूमी असते, समाजातील विसंगती, विद्रुपता, सकारात्मक - नकारात्मक भवतालच्या, निरीक्षणांतून बऱ्याच लघुकथा. आकाराला येऊ शकतात फक्त त्यासाठी मन संवेदनशील असावे लागते. दैनिक 'सामना'मधून 'अवती भवती' या साप्ताहिक सदरातून प्रकाशित झालेल्या या ललित कथांमध्ये लेखकाने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग, एखादी व्यक्ती, प्रत्यक्ष भेटलेली-न भेटलेली, ओळखीची-अनोळखी तरी भावलेली माणसे अगदी ठसठशीतपणे मांडलेली आहेत. प्रत्येक लेखाचे विषय वेगवेगळे असून वर्षभरात येणाऱ्या विशेष दिनांचे या सदरात पडसाद उमटलेले दिसतात. लेखकाने मनांत आलेल्या विचारांचे आटोपशीर वर्णन केले असले तरी दीर्घ कथांचे सार यांत उतरले आहेत म्हणायला हरकत नाही. अवतीभवतीची ही सारी निरीक्षणे एका लेखकाच्या भूमिकेपेक्षा मित्र, रसिक, हितचिंतकाच्या प्रबोधनपर संदेश देण्याच्या दृष्टीने समोर आली आहेत. पात्र रंगवताना बोलीभाषा, योग्य त्या उपमा आणि मिश्किल उदाहरणे वापरल्याने कथांमधून रंगत वाढली आहे. लेखकाचे यात कसब जाणवते. -- अनुजा सावंत (लेखिका)

View full details