Annajidnyasa By Malti Karvarkar (अन्नजिज्ञासा — डॉ. मालती कारवारकर)
Annajidnyasa By Malti Karvarkar (अन्नजिज्ञासा — डॉ. मालती कारवारकर)
Couldn't load pickup availability
‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा श्लोक जेवणापूर्वी म्हणणं आपल्याला कमीपणाचं किंवा जुनाट वाटतं. ज्या निष्ठेनं आपण यज्ञकर्म करायचो, त्याच निष्ठेनं आणि शिस्तीनं अन्नग्रहण करण्यासाठीची धारणा श्लोकातून रोज रुजवली जायची. आज खायला मिळणं अवघड राहिलेलं नाही. पण योग्य आहार मिळणं, तो वेळच्या वेळी ग्रहण करता येणं आणि तो अंगी लागणं या बाबतीत जबरदस्त बोंब आहे. चटकदार आणि पोटभरू पदार्थांमुळे मस्त वाटतं खरं, पण आरोग्य मात्र ओसरत जातं, याची जाणीव आपल्याला तीव्रतेनं होत नाही खाण्याचंही एक शास्त्र आहे. विज्ञानयुगात जगणार्या आपण सगळ्यांनी हे खाण्याचं शास्त्र मात्र आश्चर्यकारकपणे नजरेआड केलेलं आहे. ‘अन्नजिज्ञासा’ म्हणजे केवळ अन्नाची माहिती नव्हे; तर त्याचा शरीरातल्या कामासाठी कसा उपयोग केला जातो, हे समजून घेणे होय. मौजमजा करायची म्हटलं, तर शरीर ठीकठाक असावं लागतं आणि त्यासाठी औषधांपेक्षा ‘अन्नजिज्ञासा’च अधिक उपयोगी पडते. शरीर ठीकठाक राहील असं अन्न सेवन करण्यामागचं गांभीर्य समजून घ्यायचं असेल, तर ‘अन्नजिज्ञासा’ वाचण्याला आणि त्याप्रमाणे वर्तनाला पर्याय नाही, एवढं मात्र खरं!
Share
