Anavat Aksharvata By Meena Vaishapayan (अनवट अक्षरवाटा-मीना वैशंपायन)
Anavat Aksharvata By Meena Vaishapayan (अनवट अक्षरवाटा-मीना वैशंपायन)
Couldn't load pickup availability
स्त्री ही खालच्या पायरीवर असलेलीच बरी’ असा एक अघोरी कट जगातल्या तमाम नक्षरवाटा पुरुषमंडळीनी हजारो वर्ष नेटानं चालवला. विसाव्या शतकात स्त्री शिकली नि तिनं तो छान उधळून लावला. हे ‘अनवट अक्षरवाटा’चं मुख्य सूत्र आहे.
खरं तर युद्ध, रोगराई, स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती अशा नानाविध संकटांत भरडून निघाली ती स्त्रीच. आणि तिच्यामुळेच भाषा जगल्या नि भरभराटीस आल्या. मायबोली हे मानवी संस्कृतीतलं एक सुंदर, जिव्हाळ प्रकरण आहे.
पुस्तकात मीनाताईंनी एकूण तीस बंडखोर लेखिकांची आणि त्यांच्या पुस्तकांची चर्चा केली आहे. जगभरातल्या या निवडक लेखिकांच्या प्रतिभा आणि प्रेरणांचा धांडोळा घेताना भिन्न भिन्न भाषा नि संस्कृती आणि रुचिवैचित्र्य या भेदांपलीकडे जाऊन मीनाताईंनी स्त्रीशक्तीच्या प्रवासाचं सुंदर आख्यान मांडलंय, मोजक्या शब्दांत आणि रसाळ शैलीत. मीनाताईंच्या लिखाणावर दुर्गाबाईंची (भागवत) स्निग्ध सावली रेंगाळते आहे.
पुस्तकात मराठी साहित्य किंवा समाजाचे संदर्भठिकठिकाणी येतात. त्यामुळेही हे ‘अनवट अक्षरवाटा’ ‘आपलं’ वाटू लागतं.
Share
