Aiwaj Vicharancha By Dr. Chandrahas Deshpande (ऐवज विचारांचा)
Aiwaj Vicharancha By Dr. Chandrahas Deshpande (ऐवज विचारांचा)
Couldn't load pickup availability
प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज – विचारांचा' प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद' या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात स.हं.च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद', ‘सामाजिक आणि आर्थिक', ‘व्यक्तिचित्रे' आणि ‘संकीर्ण' या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
Share
