Aatmanepadi By Ratnakar Matkari (आत्मनेपदी)
Aatmanepadi By Ratnakar Matkari (आत्मनेपदी)
Couldn't load pickup availability
आत्मनेपदी म्हणजे स्वतःविषयी. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांनी स्वतःच्या साहित्य-कलेतील मुशाफिरीबद्दल केलेलं हे लेखन आहे.
रत्नाकर मतकरी हे आयुष्यभर विपुल लिखाण केलेले लेखक. नाटक आणि गूढकथा यासह विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी दमदार लेखन केलं. लिखाणाप्रमाणेच ते चित्रकलेतही रमले. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी बालनाट्य चळवळ उभी केली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थनासाठी ते रस्त्यावर उतरले. शहरातील तळागाळातल्या तरुणांना अभिव्यक्तीची संधी मिळावी यासाठी ते आजही ‘वंचितांचा रंगमंच’सारखे अभिनव उपक्रम राबवताहेत.
अशा या कर्त्या लेखकाने पंचाहत्तर वर्षांच्या प्रवासातील स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, चित्रकलेवरच्या प्रेमाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या माणसांबद्दल आणि स्वतःच्या जीवनविषयक तत्वज्ञानाबद्दल लिहिलेलं हे मनोगत.
Share
