Skip to product information
1 of 1

Aathavanitale Abasaheb (आठवणीतले आबासाहेब)

Aathavanitale Abasaheb (आठवणीतले आबासाहेब)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Quantity

एखाद्या गावाचं मूूल्यमापन करताना त्या गावात विद्यापीठे किती आहेत, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, सामाजिक संस्था, रुग्णालये, उद्याने, नाट्यगृहे, अन्य शिक्षणसंस्था किती आहेत, वाहतुकीची काय साधने आहेत हे बघितले जाते. या सर्वांइतकेच कबहुना अधिक महत्त्वपूर्ण ठरते ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, सामाजिक भान असलेल्या, लोकहिताचा विचार करणाऱ्या, अडल्या-नडलेल्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या आणि विकासाची दृष्टी असलेल्या किती व्यक्ती आहेत? हा निकष लावला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका अतिशय संपन्न म्हणावा लागेल; कारण कोणत्याही सोयी-सुविधा नसताना साधारण पन्नास वर्षांपूर्वी या परिसरात आबासाहेब काकडे नावाचे एक कर्तबगार नेतृत्व होऊन गेले.
गोरगरिबांच्या उत्थानासाठी त्यांनी शिक्षणसंस्था उभारल्या, वसतीगृहे काढली, पाणी प्रश्नावर काम केले. सत्यनिष्ठ भूमिकेचा अंगिकार करत तळागाळातील माणसाच्या भल्याचा अव्याहत विचार त्यांनी केला आणि तो मूर्त स्वरूपात यावा यासाठी जीवन समर्पित केले. एखाद्या बिजाचे रूपांतर रोपात होण्यासाठी आधी त्याला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावे लागते. त्यानंतर पुढे अनेक दिव्ये पार पाडत त्याची सुयोग्य वाढ होऊन त्याचा महाकाय वृक्ष होतो. आदरणीय आबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले संपूर्ण आयुष्य असेच सामान्य माणसाच्या हितासाठी दिले. त्याची मधुर फळे आज अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारे अनेक जण अनुभवत आहेत.

View full details