Aamhi Swayampurna By Dr. Medha Purva Samant (आम्ही स्वयंपूर्णा)
Aamhi Swayampurna By Dr. Medha Purva Samant (आम्ही स्वयंपूर्णा)
Couldn't load pickup availability
चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. मेधा पुरव सामंत यांनी तीस वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतून 'अन्नपूर्णा परिवारा'ची सुरुवात केली. आज या परिवाराने पुण्या-मुंबईतल्या सव्वा लाख कष्टकरी महिलांना आपल्या कवेत घेतलं आहे. हा परिवार २०० कोटींहून जास्त उलाढाल करणारा सहा सामाजिक संस्थांचा समूह बनला आहे. 'अन्नपूर्णा'च्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारं, एवढंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता पुरवणारं यशस्वी मॉडेल मेधाताईंनी उभं केलं आहे.
हे कसं घडलं? रोज भेटणाऱ्या भाजीवाल्या बायकांना सावकारी चक्रातून बाहेर काढण्यासाठी मेधाताईंनी स्वतःच्या खिशातून नऊ महिलांच्या गटाला पहिलं कर्ज दिलं. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर कष्टकरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करायचं पक्कं करत मेधाताईंनी बँकेतली नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कामात वाहून घेतलं. तीस वर्ष जीवाचं रान करत कल्पकता आणि धडाडीने संस्था वाढवली. महिलांच्या गरजा समजून घेत आरोग्यविमा, मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती आणि निवृत्तीनंतरच्या पेन्शनसारख्या अनेक योजना सुरू केल्या. अन्नपूर्णा परिवार हा एकखांबी तंबू होऊ नये यासाठी महिलांमधूनच नेतृत्वही घडवलं. महिलांनाच नव्हे, तर संस्थेलाही स्वतःच्या पायावर उभं केलं.
या अफाट प्रवासाची गोष्ट सांगणारं एका सामाजिक उद्योजिकेचं प्रेरणादायी कार्यचरित्र.
Share
