Skip to product information
1 of 1

A Wanted Man By Lee Child, Sarita Athawale (अ वॉन्टेड मॅन)

A Wanted Man By Lee Child, Sarita Athawale (अ वॉन्टेड मॅन)

Regular price Rs. 638.00
Regular price Rs. 750.00 Sale price Rs. 638.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आडबाजूच्या पाणीउपसा केंद्रावरील काँक्रीटच्या शेडमध्ये एका व्यक्तीचा सुर्‍याने भोसकून खून होतो. गुन्हेगार आहेत दोन पुरुष. एका महिलेलाही त्यांनी जबरदस्तीने बरोबर घेतलंय. खुनाची घटना असल्यामुळे स्थानिक पोलिसांसह एफबीआय, सीआयए, परराष्ट्र मंत्रालय अशा विविध संघटना त्यांच्या मागावर असतात. रस्त्यात हे गुन्हेगार रीचरला लिफ्ट देतात. एक भटका प्रवासी अशी ओळख सांगणारा, सडाफटिंग दिसणारा रीचर प्रत्यक्षात अत्यंत अनुभवी व चतुर निवृत्त सैन्याधिकारी असतो. त्या दोन गुन्हेगारांविषयी रीचरला संशय येत असतो आणि तो फोनवरून एफबीआयला त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ते गुन्हेगार मध्येच रीचरला ठार मारण्याचा प्रयत्न करतात; पण तो वाचतो. त्या गुन्हेगारांबरोबर असणारी स्त्री नक्की कोण आहे? या खुनाचा तपास संबंधितांना कोणत्या मोठ्या षड्यंत्रापर्यंत घेऊन जातो? कादंबरीचा नायक रीचरच्या साहसाने आणि बुद्धिचातुर्याने वाचकांना स्तिमित करणारी उत्कंठावर्धक कादंबरी.

View full details