Raavan Aryavartacha Shatru : रावण आर्यावर्ताचा शत्रू By Amish Tripathi
Raavan Aryavartacha Shatru : रावण आर्यावर्ताचा शत्रू By Amish Tripathi
अंधार नसेल, तर प्रकाशाला काही हेतूच उरत नाही.
खलनायक नसेल, तर देवांचे काम काय?
भारत, ख्रि.पू. ३४००
हाहाकार, दारिद्र्य आणि गोंधळ यांनी ग्रासलेला देश. बहुतांश लोक चुपचाप सहन करणारे. काही बंड करतात. काही अधिक चांगल्या जगासाठी लढा देतात, काही स्वतःसाठी लढतात. काही कशाचीच पर्वा करत नाहीत.
रावण, त्या काळातील अत्यंत ख्यातनाम पित्याचा पुत्र. देवांकडून सर्वोच्च बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेला. नशिबाकडून टोकाच्या परिस्थितींमध्ये परीक्षा देण्याचा शाप मिळालेला. किशोरवयात भयावह जलदस्यू म्हणून त्याच्यात धैर्य, क्रौर्य आणि भयंकर निश्चय यांचं मिश्रण आहे. मानवांमधील दैत्य होण्याचा निश्चय; आपल्या हक्काची महानता जिंकण्याचा, लुटण्याचा, बळकावण्याचा निश्चय.
अमानुष हिंसा आणि प्रकांड विद्वत्ता अशा विरोधाभासाचा पुरुष. कोणत्याही प्रतिफलाशिवाय प्रेम करणारा आणि कोणत्याही अनुतापाशिवाय हत्या करणारा पुरुष.
राम चंद्र मालिकेतील हे तिसरं उल्हसित करणारं पुस्तक लंकापती रावणावर प्रकाश टाकतं. आणि हा प्रकाश सर्वांत काळ्याकुट्ट अंधारात चमकून दिसतो. तो इतिहासातील सर्वांत महान खलपुरुष आहे, की केवळ सर्वकालच्या काळोखातील एक मनुष्य आहे?
एका अत्यंत गुंतागुंतीच्या, हिंसक, उत्कट आणि सर्वकालीन यशस्वी पुरुषाचं महाकाव्य वाचा.