Bullets Over Bombay By Uday Bhatia, Akshay Shelar(Translators) (बुलेट्स ओव्हर बॉम्बे)
Bullets Over Bombay By Uday Bhatia, Akshay Shelar(Translators) (बुलेट्स ओव्हर बॉम्बे)
सत्या सिनेमा बनवला कसा गेला इथपासून पुस्तक चालू होऊन चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, कथानक कसं लिहिलं गेलं, चित्रपटांच्या स्टाइल, लेगसी या सगळ्याबद्दल हे पुस्तक बोलतं.
सत्याची चर्चा करता करता आपण शोले पर्यंत पोहचतो, शोले पासून वन्स अपॉन टाइम इन वेस्ट, द गुड द बैड द अग्ली, द मॅग्निफिसंट सेव्हन मग अचानक चायना गेट वरून परत भट्ट कँप, मनोज वाजपेयी आणि भारतीय गँगस्टर सिनेमांवर येतो. कॅमेरा, प्रकाश, सावल्या, गाणी, डायलॉग हे सगळं ठरवतं, करतं नेमकं कोण, कसं आणि कधी हे सगळं आपल्याला समजत जातं.
आणि मुंबई… मुंबई या पुस्तकाच्या सांधी-कोपऱ्यातून आपल्यात भिनते. सिनेमा काय दाखवतो आणि ते कितपत खरं असतं ही चर्चा बार, मागच्या अंधारलेल्या खोल्या, बिल्डरचे चमचमीत ऑफिसेस, चिंचोळ्या गल्ल्या, बीचेस, झोपडपट्ट्या, श्रीमंत माणसं, धारावी, चाळी, बंद पडलेल्या गिरण्या हे सगळं या पुस्तकात आहे.
सिनेमाबद्दल लिहिता लिहिता आपल्याला मुंबई आणि बॉलिवूडचं सोशल स्ट्रक्चर दाखवणारं हे पुस्तक आहे.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिनेमा बनवला कसा जातो याबद्दल इनसाइट मिळवायला हे पुस्तक महत्वाचं आहे.