Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
मानवी प्रगतीमधील सर्वात उल्लेखनीय शोध म्हणजे इंटरनेट. या तंत्रज्ञानामुळे जग जितके जवळ आले आहे, तितकेच त्यामुळे प्रश्नही निर्माण झाले आहेत. इंटरनेटच्या या युगात सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य हिरावून घेणाऱ्या अशाच काही भीषण प्रश्नांवर भाष्य करणारी ‘नेटपर्णी ही एक आगळीवेगळी कादंबरी आहे.कादंबरीच्या ‘नेटपर्णी या उत्कंठावर्धक शीर्षकाचा संदर्भ ‘घटपर्णी’ या मांसाहारी वनस्पतीशी आहे. ज्याप्रमाणे घटपर्णी वनस्पती आपल्या आकर्षक रंग आणि सुगंधाच्या सहाय्याने भक्ष्याला स्वतःकडे आकर्षित करून क्षणार्धात गिळंकृत करते, अगदी त्याप्रमाणेच इंटरनेटच्या महाजालात सोशल मीडियावरील ‘नेटपर्णी म्हणजेच भक्ष्यासाठी घात लावून बसलेल्या टोळ्या एखाद्या व्यक्तीला सहज आपल्या जाळ्यात ओढून शेवटी गिळून टाकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर व उत्तेजक ललना किंवा आर्थिक फायद्याच्या प्रलोभनांना भुलून एखादी व्यक्ती नेटपर्णीच्या जाळ्यात फसली की सुरू होतो खंडणीचा खेळ !नेटपर्णीच्या या जाळ्यात आजतागायत कित्येकांनी आपले सर्वस्व गमावले आहे. काही त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतात तर काही सामाजिक बदनामीच्या भीतीने स्वतःला संपवण्याचा पर्याय निवडतात. एका मोहापायी त्यांचे संपूर्ण आयुष्य, कुटुंब, नाती कशी उध्वस्त होतात या कटू वास्तवाची, त्यातील सामाजिक परिणामांची भीषणता या कादंबरीने समोर आणली आहे. चित्रदर्शी लेखनशैली, लालित्यपूर्ण ओघवती भाषा, चपखल संवाद, जादुई वास्तव, उत्कंठा वाढविणारे कथानक यांमुळे कादंबरीची वाचनीयता वाढली आहे. केवळ तरुणच नव्हे, तर प्रत्येक वयोगटातील वाचक आजच्या ज्वलंत सामाजिक वास्तवाला भिडणाऱ्या या कादंबरीचे नक्कीच स्वागत करतील.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books