Skip to product information
1 of 1

Bread, Cement, Cactus By Annie Zaidi, Sunanda Amrapurkar(Translators)

Bread, Cement, Cactus By Annie Zaidi, Sunanda Amrapurkar(Translators)

Regular price Rs. 251.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 251.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

घर म्हणजे नक्की काय? आणि त्याला जोडली गेलेली आपलेपणाची भावना म्हणजे काय? एखाद्या परिसरात अल्पसंख्याक म्हणून वावरताना या संकल्पनेपुढे भलतेच प्रश्न उभे राहतात. काय आपलं आणि काय परकं याचीच संदिग्धता लागून राहते. त्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा होतो. अ‍ॅनी झैदी अशाच एका प्रश्नातली गुंतागुंत मांडत स्वतःचं आयुष्य मांडतात. आपल्या वडिलोपार्जित गावापासून, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या प्रदेशात, त्या आता राहत असलेल्या मेगा-सिटीपर्यंतचा हा प्रवास आहे. झैदी अल्पसंख्याक म्हणून आपलेपणाच्या भावनिक निकडीबद्दल आणि इतर समुदायांकडून मिळणाऱ्या तुसड्या वागणुकीबद्दल मांडणी करत स्थलांतरितांच्या जगण्याबद्दलचा एक सूक्ष्म दृष्टीकोन प्रदान करतात.

View full details