Skip to product information
1 of 1

Tumchi Kala Tumache Career By Subhash Bhave, Manohar Ingle (तुमची कला तुमचे करिअर )

Tumchi Kala Tumache Career By Subhash Bhave, Manohar Ingle (तुमची कला तुमचे करिअर )

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.
अनेक मुलांच्या अंगात विविध कला असतात. मात्र ‘अर्थार्जन’ हेच बहुतेक सर्वांच्याच शिक्षणाचं ध्येय असल्याने आणि कलेतून अर्थार्जन अशक्य असल्याची बहुतेक पालकांची ठाम श्रद्धा असल्याने अशा मुलांची कला छंदापुरती मर्यादित राहते. यातून ही मुलं केवळ अर्थार्जनासाठी नावडतं काम करत राहतात आणि कामातल्या आनंदाला पारखी होतात.
मागच्या वीस-पंचवीस वर्षांत जसजशी देशाची आर्थिक प्रगती झाली, तसतशी कलांना ऊर्जितावस्था आली. आज औपचारिक क्षेत्रांखेरीज कलाधिष्ठित अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. त्या कलांचं व्यवसायात रूपांतर करून पुरेसं अर्थार्जन तर करता येतंच, पण आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात काम करण्याचा अतुलनीय आनंदही मिळविता येतो. अशा प्रकारे कलेकडे व्यवसाय म्हणून पाहणार्‍या, अंगभूत कला असणार्‍या अनेक व्यक्ती व्यावसायिक कलाकार झाल्या. कला हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन झालं. अशा २० व्यक्तींनी कलेतून यशस्वीरित्या व्यवसाय कसा केला, हे सांगण्याचा आम्ही या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.
ज्यांना आपल्या कलेतून उपजीविका करण्याची इच्छा आहे त्यांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल असा विश्वास वाटतो. 

View full details