Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
जगप्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन यांची तीन बेस्ट-सेलर पुस्तक…
१) सत्ता- शक्तीचे ४८ नियम२) नवा दिवस नवीन नियम३) मानवी स्वभावाचे नियम
१) सत्ता- शक्तीचे ४८ नियमतुम्हाला आवडो वा नावडो; पण सत्तेचे हे सगळे नियम रोजच्या जीवनातील घडामोडीतही लागू पडतात असे दिसून येते. तीन हजार वर्षांच्या इतिहासातील सत्तेच्या सर्व पैलूंचे सार ह्या पुस्तकात ४८ प्रकरणांमधून अत्यंत बोचक आणि तरीही वेधक शैलीत स्पष्टिकरणासहित मांडण्यात आले आहे. ग्रंथाची चित्तवेधक विशिष्ट मांडणी आणि आशय ह्यातून ह्या ४८ नियमांवर कोणतीही कृत्रिम झळाळी न चढवता, मॅकिआव्हेली, त्सून झू. कार्ल फॉन क्लॉजेबिट्स आणि इतर अनेक तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त साररूपाने आधार घेत, ह्या ग्रंथाची रूपरेषा आखलेली आहे.पानांची संख्या – ६६८किंमत- ६००
२) नवा दिवस नवीन नियमवाचकांना वर्षभर शिकता येईल असं मौल्यवान दैनंदिन शहाणपण, तसंच प्रकाशित व अप्रकाशित लेखनाचं सार हे नवा दिवस नवा नियम या पुस्तकातून दिलेलं आहे. लेखकाने आपल्या भल्यासाठी ह्या पुस्तकात 366 नियम सादर केलेले आहेत.पानांची संख्या – ४५०किंमत- ५००
३) मानवी स्वभावाचे नियमहे पुस्तक सभोवतालच्या लोकांच्या स्वभावाचा उलगडा करून घेण्यासाठीची नियमावली म्हणून वापरावे. सर्वसामान्य माणसे, विचित्र माणसे, विध्वंसक माणसे वगैरे संपूर्ण श्रेणी तुम्हाला त्यामध्ये सापडेल. ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण मानवी स्वभावाच्या एखाद्या विशिष्ट छटेविषयी भाष्य करते. प्रत्येक प्रकरणाचा शेवट अशा वाक्याने केला आहे की, आपण ही मूळ मानवी प्रेरणा अधिक सकारात्मक आणि विधायकपणे कशी वापरू शकतो जेणेकरून आपण इथून पुढे मानवीस्वभावाचे गुलाम बनून राहणार नाही तर अधिक सक्रियपणे त्यामध्ये बदल घडवून आणू.पानांची संख्या – २७२किंमत- ३००
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books