Bhintiaadacha Cheen By Shreeram Kunte ( भिंतीआडचा चीन )
Bhintiaadacha Cheen By Shreeram Kunte ( भिंतीआडचा चीन )
भारताशी चीन शत्रुत्वाने का वागतो? चीनकेंद्रित जगाचे धोके काय
असतील? चीनच्या नाकावर टिच्चून भारत महासत्ता होईल का?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात.
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चीनचा इतिहास, कम्युनिस्ट
पक्षाची अमानवी धोरणं, त्यातून चीनने घेतलेली झेप, इतिहास
आणि वर्तमानाबद्दलच्या भानातून तयार झालेलं चीनचं परराष्ट्र धोरण,
चीनचा भारताला असणारा धोका या सर्व अंगांनी श्रीराम कुंटे यांनी
सखोल अभ्यास केला. त्यातून ‘भिंतींआडचा चीन` जन्माला आलं आहे.
महासत्ता होऊ घातलेल्या चीनमधल्या साम्राज्यशाहीच्या इतिहासापासून
ते आजच्या उत्तुंग प्रगतीपर्यंतचा आढावा घेत लेखकाने या पुस्तकातून
चीनची कुंडली मांडली आहे. भारताच्या संदर्भात चीन समजून घ्यायचा
असेल, तर चिनी राजघराण्यांचा इतिहास, स्थित्यंतराची चाळीस वर्षं, जगाला
चकित करणारा काळ आणि भारतासमोरील चिनी आव्हानं या चार भागांत
विभागलेलं हे पुस्तक आपल्या जवळ असायलाच हवं.
चीनची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाची मराठीत कमी होती. श्रीराम कुंटे
यांच्या ‘भिंतींआडचा चीन`मुळे ही उणीव भरून काढण्यास मदत होईल.
या निमित्ताने आंतरराष्ट्रीय विषयांवर प्रबंधी-प्राध्यापकीपणा टाळून जनसामान्यांसाठी
लिहिणारा एक नवा लेखक कुंटे यांच्या रूपाने मराठीत समोर येताना दिसतोय.
गिरीश कुबेर (संपादक, दै. लोकसत्ता व लेखक)
एका संतुलित राष्ट्रवादी दृष्टिकोनातून, तसेच बहुविद्याशाखीय जाणकारीतून
लिहिलेले हे पुस्तक आपल्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या
प्रवासातील अत्यावश्यक वाचन ठरणार आहे.
रवि आमले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)
महत्त्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यास आसुसलेल्या भारतीयांना स्वतःच्या व
चीनच्या मर्मस्थळांची जाणीव हे पुस्तक कळात-नकळत करवून देते.
प्रा. परिमल माया सुधाकर (चीनचे अभ्यासक व लेखक)
Bhintiaadacha Cheen | Shreeram Kunte
भिंतीआडचा चीन । श्रीराम कुंटे