Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 400.00Rs. 320.00
Availability: 50 left in stock

1) Intraday Trading - Indrazith Shantharaj
2)
Share Bazar 41 sutra -Mahesh Chandra Kaushik


Intraday Trading - बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.
खरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.
तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!

Share Bazar 41 sutra- शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते. एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो. किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात. प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे. या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Share Market Books - Intraday Trading + Share Bazar 41 sutra (शेअर मार्केट ट्रेडिंग)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books