Vanshvruksha : वंशवृक्ष By S.L. Bhairappa | Translators Uma Kulkarni
Vanshvruksha : वंशवृक्ष By S.L. Bhairappa | Translators Uma Kulkarni
अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा ?
बीजाचा की क्षेत्राचा ? महाभारतात उद्भवलेला हा प्रश्न. डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी मन्वंतर काळाची पार्श्वभूमी घेऊन या प्रश्नावर चर्चा केली आहे. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री भागीरथम्मा - लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव - नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज - कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांची प्रतिभा उच्च कोटीची रसनिष्पत्ती करते याचा अनुभव या कादंबरीत पानोपानी येतो.
वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी कादंबरी.
या कादंबरीला 1989 सालचा केंद्र साहित्य अकादमीचा 'अनुवाद पुरस्कार’ मिळाला आहे. त्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळातील समग्र अनुवादांचा विचार केला गेला होता. डॉ. भैरप्पांच्या मूळ कादंबरीतली रसोत्कटता अनुवादातही जशीच्या तशी ठेवण्याचं कौशल्य सौ. उमा वि. कुलकर्णी यांचं !