विचारांमध्ये खूप ताकद असते. ते अमूर्त नसतात, तर सामर्थ्यशाली असतात. जेव्हा केव्हा त्या विचारांमागे एखादा विशिष्ट हेतू असतो, तो हेतू पूर्णत्वाला नेण्याची चिकाटी असते, तेव्हा ते विचार प्रचंड ताकद धारण करतात. त्या विचारांच्या माध्यमातून आपल्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर जेव्हा आपण भौतिक परिस्थितीत बदल घडवतो, तेव्हा तेव्हा ते विचार मूर्त शक्ती बनलेले असतात. जेव्हा आपण श्रीमंत होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि विशिष्ट विचारांच्या आधारे पावले टाकत जातो, तेव्हा विचार हे सामर्थ्यशाली वस्तूत रूपांतरित होतात. आपण विचारांच्या साहाय्याने संपत्तिवान बनू शकतो, याची जाणीव एडविनसी वार्नसला तीस वर्षांपूर्वी झाली; परंतु हा शोध त्याला अचानक लागला नव्हता. एकाच बैठकीत त्याला सर्व सुचले नव्हते. एडिसनचा भागीदार होण्याचे स्वप्न त्याच्या मनात फुलले. त्याची ती सुप्त इच्छा सावकाश आकार घेत गेली आणि वाढता वाढता इतकी तीव्र झाली, की तो एक दिवस एडिसनसमोर उभा राहिला. जर तुमची सगळ्यात मोठी गरज असेल....'श्रीमंत होणं' जर तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न असेल...'श्रीमंत होणं' जर तुमची सगळ्यात मोठी इच्छा असेल...'श्रीमंत होणं' तर आधी बदल घडवावा लागेल तो विचारांमध्येच. श्रीमंत होण्याआधी करावा लागेल, 'श्रीमंत विचार'. यासाठी तर वाचायलाच हवं... श्रीमंत करणारं हे पुस्तक!