Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार्यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने...
चिरतरूण स्वर : आशा भोसले-आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, चुकवू नये अशी मैफल...
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books