Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
राम राज्य. सर्वार्थानं संपूर्ण भूमी.अर्थातच याची किंमत मोजावी लागते.त्याने ती किंमत मोजली.भारत, इ.पू. ३४००फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानाचे परिणाम समाजात कोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते.असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनांना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो – राम नावाचा राजपुत्र.देशवासियांनी त्याला जरी यातना दिल्या तरी त्याचं आपल्या देशावर खूप प्रेम असतं. तो कायद्याचा पाठीराखा बनतो. त्याचे तीन भाऊ, त्याची पत्नी सीता आणि तो स्वतः त्या कोलाहलमिश्रीत अंधःकाराविरोधात ठामपणे उभे राहतात. इथरांनी ठेवलेल्या ठपक्यातून राम बाहेर निघू शकतो का? सीतेवरील त्याचं प्रेम त्याला प्राप्त संघर्षांतून तारून नेतं का? त्याचं बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांच्या राजा रावणाचा बीमोड तो करतो का? विष्णूपदाला तो प्राप्त होतो का?अमीश यांच्या पुढील महाकथेची सुरुवात करणारी – राम चंद्र मालिका!
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books