Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 800.00Rs. 640.00
Availability: 50 left in stock

सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर- लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार्‍यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने...

चिरतरूण स्वर : आशा भोसले- आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, चुकवू नये अशी मैफल...

नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी-

मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक 

सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर 

लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! 

पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. 

प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, 

शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून 

सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... 

रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. 

म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! 

संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे 

या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! 

अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी 

आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... 

क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...

आवाजाचा अवलिया - किशोर कुमार

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं 

हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. 

एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. 

‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर 

‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. 

‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर 

‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. 


या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर 

आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. 

कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? 

सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? 

या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील 

किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण... 

ते वाचून तुम्हाला मूड येईलच, 

तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. 

तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या..


Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

4 Book Set - ( Asha Bhosale, Lata Mangeshkar, Mohammad Rafi, Kishor Kumar)-(४ पुस्तकांचा संच - संगीत क्षेत्रात गाजलेले कलाकार -आशा भोसले, लता मंगेशकर , मोहम्मद रफी, किशोर कुमार )
- +

Recently Viewed

Recently Viewed Books