Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचितकरणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात.डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, ‘वैश्विक नैतिकतेचीकमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे. छोट्या छोट्यातुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचेपेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोकेवर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असेआपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तरबदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यतायांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच| राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फारलांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवरआलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यातआकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकारदेत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणिशांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडलापाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.– रघुराम राजन
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books