Mulanchi Budhimatta Viksit Karayachya 21 Padhati By Manoj Ambike
Mulanchi Budhimatta Viksit Karayachya 21 Padhati By Manoj Ambike
बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांना पैलू पाडण्यासाठी...... मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती हे पुस्तक केवळ बुद्धिमत्तेवरच भाष्य करत नाही तर मुलांच्या संपूर्ण विकासावरच भाष्य करतं. मुलांचा संपूर्ण विकास करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासही होणं आवश्यक आहे. जगात यश मिळविण्यासाठी बुद्धिमत्ता चांगली असायलाच हवी, स्वभाव चांगला असायला हवा, त्याचबरोबर मुलांच्या सवयींवर काम होणंसुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच या पुस्तकात शेवटी २१ अशा सवयी देण्यात आल्या आहेत ज्यांचा वापर मुलांनी आपल्या आयुष्यात करायला सुरुवात केली तर त्यांचा भविष्यकाळ नक्कीच चांगला जाईल. पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे...... * मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व * सेल्फ स्टडीचे तंत्र * मुलांची बलस्थाने ओळखा * मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास * इच्छाशक्तीची ताकद * मुलांना क्रिएटिव्ह बनवा मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * मुलांच्या संपूर्ण विकासाच्या २१ पद्धती स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या * यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक २१ सवयी