Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 250.00Rs. 213.00
Availability: 50 left in stock

इंग्लंडसारख्या देशात रक्तदान हा हिंदूंच्या सोळा संस्कारांसारखा संस्कार मानला जातो. तिथे रक्त विकणे ही कल्पनाच मानली जात नाही. आपल्या आध्यात्मिक देशात मात्र रक्त विकत देणारे लोक आहेत. रक्त विकून त्यांना पोटाची खळगी भरावी लागते. नित्य नेमाने रक्त विकणारी माणसे ह्या देशात आहेत. ह्या मुंबई शहरातल्या सार्वजनिक रुग्णालयात वर्षाला सुमारे एक लाख बाटल्या रक्ताची गरज असते. रक्त देणार्‍यांना दहा बारा रुपये दरवेळी द्यावे लागतात. व्कचित प्रसंगी ही माणसे पन्नास रुपये बाटलीपर्यंत दर वाढवतात. दर आठवड्याला स्वत:चे रक्त विकून उपजिविका करणारी माणसे ह्या मुंबई शहरात आहेत. इतकेच नव्हे, तर ह्या धंदेवाईक रक्तविक्यांची आता युनियन झाली आहे. दरिद्री आणि गुंड लोकांचा ह्यात फार मोठा भरणा आहे. पैसे वाढवून द्या अशा त्यांच्या मागण्या आहेत. आमची सामाजिक नीतिमत्ता तर फारच वरच्या दर्जाची. एका हॉस्पिटलमधल्या रक्त साठवण्याच्या थंड खोलीत हॉस्पिटलचे प्रमुख आपली भाजी, फळे वगैरे ठेवतात. थंड पाणी पिण्याच्या बाटल्या ठेवतात. त्या काढायला आणि ठेवायला शंभरवेळा ती खोली उघडतात त्या खोलीचे तापमान बिघडते आणि मोलाने जमविलेले रक्त फुकट जाते. गुन्ह्याचे मूळ हे आर्थिक दारिद्र्य नसून मनोदारिद्र्य आहे. गरिबांनी शेण खाल्ले, तर भुकेपोटी खाल्ले म्हणता येते, पण श्रीमंत खातात त्याची कारणे कुठे शोधायची?

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Bhavgandh By P L Deshpande (भावगंध)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books