Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
बचतीचा आणि गुंतवणुकीचा विषय सुरू झाला, की बहुतेकांचा गोंधळ उडतो. नक्की किती आणि कशी बचत करावी, गुंतवणूक नक्की कोठे करावी, यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात.. दुर्दैवाने यासंबंधी दिला जाणारा सल्ला हा पूर्वग्रहदूषित आणि जुन्या समजुतींवर आधारित असतो. ‘जस्ट कीप बाईंग’ या पुस्तकात निक मॅग्गीली यांनी दिलेला सल्ला हा पूर्णपणे आकडेवारीवर आधारित शास्त्रोक्त सल्ला आहे. या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतः चागुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकता आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करू शकता. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वाटते तेवढी बचत करण्याची गरज नसते. शिवाय प्रत्येक वेळी गुंतवणुकीसाठी शेअर बाज़ार पडण्याची वाट बघायची आवश्यकता नसते. बाजार कोसळल्यानंतर आपण त्यातून तरून कसे जायचे हेदेखील तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनाने लक्षात येईल.
या पुस्तकाच्या वाचनानंतर तुम्ही गुंतवणुकीसाठी अधिक सजग व्हाल, अधिक स्मार्ट व्हाल आणि श्रीमंत होण्याचा तुमचा मार्ग अधिक सोपा होईल. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनातील पुढची पायरी म्हणजे गुंतवणुकीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक वाचणे.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books