Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
संपवा तो संघर्ष, तुम्हाला काय हवंय ते बोलून टाका आणि अनुभवा…तुम्ही जसे आहात तसे जगण्याचं स्वातंत्र्य.काम आणि जगणे यातला समतोल राखण्यासाठी, विखारी लोकांसोबत जमवून घेण्यासाठी आणि आपले सहकारी, मित्र व परिवार यांच्यासोबत भरभक्कम नात्यांची मजा लुटण्यासाठी सशक्त सीमा आखलेल्या असणे आवश्यक असते, हे आपण सारेच जण जासून असतो. पण सशक्त सीमा म्हणजे नेमके काय, आपल्या गरजा आपण यशस्वीरीत्या कशा बोलून दाखवाव्या आणि समोरच्याला न दुखवता नाही म्हणता येण्याची हिंमत कशी एकवटावी- हे आपण जाणतो का ? एक मान्यताप्राप्त समुपदेशक, ज्यांच्याकडून वारंवार मदत घेतली जाते, अशा नातेसंबंधाच्या मार्गदर्शक आणि इन्स्टाग्रामवरील एक अत्यंत प्रभावी मानसोपचारतज्ज्ञ असणाऱ्या नेड्रा ग्लोव्हर तव्वाब यांनी आजच्या जगातील हा गुंतागुंतीचा विषय आपल्या या पुस्तकात सोपा करून आणि उलगडून दाखवला आहे. जणू आपल्याशीच बोलत आहेत असे वाटणाऱ्या त्यांच्या सुलभ आणि सर्वसमावेशक शैलीत सीमा आखा शांती मिळवा या पुस्तकात त्या आपल्याला जीवनाच्या सर्वपैलूंसाठी सशक्त सीमा कशा आखाव्या याच्या साध्या सोप्या; मात्र हमखास यशस्वी युक्त्या शिकवतात. कॉग्रिटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी)च्या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि उपचारपद्धती यांचा पाया लाभलेल्या त्यांच्या या युक्त्या आपल्याला हे शिकवतात की, आपल्याला नेमके काय हवेआहे हे कसे ओळखावे, आपल्या गरजा स्पष्टपणे आणि अपराधी वाटून न घेता कशा व्यक्त कराव्या आणि चिंतातुरता, नैराश्य, नात्यांमधील सत्तासंघर्ष, परस्परावलंबित्व, वैफल्य या आणि अशा अनेक मानसिक समस्यांमागील मूळ कारणे कशी हुडकावीत.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books