Isreal Ani Palestinecha Sankshipta Itihas By Michael Scott-Baumann
Isreal Ani Palestinecha Sankshipta Itihas By Michael Scott-Baumann
या सुस्पष्ट, प्रांजळ आणि तटस्थ इतिहासकथनातून मायकल स्कॉट-बोमन यांनी
इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्षातील गुंतागुंत सुलभरीत्या समजावून सांगितली आहे.
– जॉन मॅकह्युगो
अ कन्साईज हिस्ट्री ऑफ अरब या पुस्तकाचे लेखक इस्रायली- पॅलेस्टिनी संघर्षाच्या उगमाचा आणि विकासाचा मागोवा घेणारा सुलभ आणि आवश्यक इतिहास.
इस्रायली आणि पॅलेस्टिनींमधील सातत्याने सुरू असलेला संघर्ष हा आधुनिक काळातील सर्वात कटू संघर्ष ठरला आहे. या संघर्षाचे जागतिक परिणामही दिसत
आहेत. मध्यपूर्वेचे तज्ज्ञ असलेल्या मायकल स्कॉट-बोमन यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते वर्तमानापर्यंतच्या या भागाच्या इतिहासाचा आलेख
मांडला आहे. या संघर्षाचा सर्वसमावेशक आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा असा आढावा लेखकाने घेतला आहे.
यातील प्रत्येक प्रकरण राजकारणाचे सुबोध स्पष्टीकरण देऊ करते, यात या संघर्षाने आघातग्रस्त झालेल्या इस्रायली आणि पॅलेस्टिनींच्या वैयक्तिक नोंदींचासुद्धा समावेश आहे. दोन्ही बाजूंचे परस्पर विरोधी निष्कर्ष समोर मांडतानाच स्कॉट बोमन विसाव्या शतकातील हिंसक युद्धाची शक्यता असलेल्या ठिकाणांचेही परीक्षण करतात. २०२३ मधील नुकत्याच झालेल्या इस्रायलवरील हमासच्या अचानक हल्ल्याने या भागात युद्धाला नव्याने सुरुवात झाली. या युद्धाचीही समीक्षा करत लेखकाने ही नवीन आवृत्ती अद्ययावत बनवली आहे. पॅलेस्टाईन भूभागावरील इस्रायली कब्जाचे स्वरूप तसेच त्याला होत असलेला पॅलेस्टिनी प्रतिकार या दोहोंचेही चित्रण करत सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या मर्मस्थानी पोहोचण्याचे काम लेखकाने केले आहे. आजकालच्या या संदर्भातील ठळक बातम्यांचा आशय समजून घेण्यासाठी तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्यास आंतरराष्ट्रीय प्रयत्न वारंवार अपयशी का ठरत आहेत, याचे विश्लेषण समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे अपरिहार्य ठरते.