Hindurao Ghorpade - Gharanyacha Dakshinetil Itihas By S M Garge
Hindurao Ghorpade - Gharanyacha Dakshinetil Itihas By S M Garge
मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थानी गौरवास्पद ठरावी अशीच होती. म्हाळोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ रणांगणात लढता लढता देह ठेवले तर म्हाळोजींचे सुपुत्र आणि संताजींचे बंधू हिंदुराव घोरपडे यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी गाजवून गुत्ती - सोंडूर हा प्रदेश काबीज केला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुरारराव घोरपडे यांनी इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला. दक्षिणेत रुजलेल्या या हिंदुराव घोरपडे घराण्याच्या युद्धकौशल्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीची प्रशंसा खुद्ध इंग्रज आणि फ्रेंच इतिहासकारांना व राज्यकर्त्यांनाही करावी लागली. सर यदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी म्हटले आहे की, 'जोपर्यंत घोरपडे घराण्याच्या दक्षिण भारतातील कामगिरीचा आणि महत्वपूर्ण संबंधित घटनांचा इतिहास लिहिला जाणार नाही, तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही.